₹120.00
1. प्रस्तावना
फेब्रुवारी 2015 मधील उदाहरणार्थ (नेमाडेंना उचकी!) कोणताही एक दिवस, ज्या दिवशी UPSC
ने Central Armed Police Forces Assistant Commandants Examination चा अंतिम निकाल
जाहीर केला. निकालाच्या आधीची रात्र मी राजगडावर मुक्कामी होतो. ट्रेक संपवून पुण्यात पोहोचलो आणि
UPSC ने निकाल जाहीर केला. आधीच्या दिवशी राजगड आणि दुसऱ्या दिवशी UPSC चा असे सलग
दोन गड सर केल्याचा आनंद अवर्णनीयच….
त्यावेळी या परीक्षांविषयी किंवा असिस्टंट कमांडंट या पदाविषयी फारशी कोणालाच माहिती
नव्हती. घरी, नातेवाईकांना, मित्रांना ही गोड बातमी देताना माझी चांगलीच दमछाक व्हायला लागली.
मला कमांडर, कॅप्टन, असिस्टंट कर्नल अशा बर्याच नवनवीन उपाध्या द्यायला सुरुवात केली. या सगळ्या
गोंधळावर उपाय म्हणून माझ्या घरी, गावाकडे, नातेवाईकांना मी सेंट्रल डीवायएसपी झाल्याचे सांगायला
सुरुवात केली. असिस्टंट कमांडंट हे पद वेतनश्रेणीनुसार डीवायएसपी/पोलिस उपअधिक्षक पदास समकक्ष
आहे. म्हणून त्यावेळी असं सांगताना मला काही संकोचही वाटला नाही.
या सर्व पार्श्वभूमीवर मला असं वाटलं की या परीक्षेसंदर्भात आणि Central Armed Police
Forces विषयी थोडंसं प्रबोधन करणं गरजेचं आहे. या पुस्तकाची संकल्पना अगदी तेव्हापासून माझ्या
मनात ठाम झाली होती. पुढे प्रशिक्षणासाठी BSF Academy टेकनपूर (ग्वाल्हेर) येथे रुजू झालो. Border
Security Forceचं प्रशिक्षण पूर्ण करणं हे एक दिव्यकर्मच. त्यामुळे तिथे पुस्तक लिहिणं वगैरे असे
विचारसुद्धा मनाला शिवत नाहीत. त्यानंतर पंजाबमध्ये भारत-पाक सीमेवर माझं पहिलं पोस्टिंग झालं.
त्यानंतर काही महिन्यांतच आमची पूर्ण बटालियन मिझोरामला Move झाली. इथे सेटल होईपर्यंत पुन्हा
YOs म्हणजेच Young Officers’ Courses साठी पुन्हा Central School for Weapon and
Tactics (CSWT) इंदौर येथे 3 महिने आणि कमांडो प्रशिक्षणासाठी पुन्हा अडीच महिने टेकनपूरला गेलो.
मधल्या काळात लग्नकार्यही उरकून टाकलं (!) पुन्हा मिझोरामला रिपोर्ट केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की
मागच्या चार वर्षांतही CAPF विषयी फारसं काही कोणाला नव्यानं माहिती झालंय असं चित्र काही
दिसत नाही.
CAPF परीक्षेचं UPSC च्या वेबसाईटवर नोटिफिकेशन आलं की आजही अनेक Young
Aspirants परीक्षेविषयी मार्गदर्शनासाठी फोनकॉल्स करतात. रिकामा असेल तर विस्ताराने सांगता येतं,
बोलता येतं. कामात व्यस्त असेल तर थोडंसं उडवाउडवीचं उत्तर देऊन वेळ निभवावी लागते. या गोष्टीचं
मला खूप वाईटही वाटायचं आणि मनात शल्यही बोचत राहायचं. म्हणून शेवटी निर्धार करून ठरवलं की
आता वेळात वेळ काढून हे पुस्तक पूर्ण करू. हे पुस्तक मी Young Aspirants आणि भारत देशाचे सर्व
तरुण Spartans यांना डोळ्यासमोर ठेवून लिहीत आहे.
Reviews
There are no reviews yet.