वैश्विकतेचे भान आणि कर्तृत्व असलेल्या युवापिढीसाठी राष्ट्रीय चारित्र्याचे व्यावसायिक तज्ज्ञ व्हावेत
म्हणून
आवडीची सेवा मिळणे किंवा न मिळणे, परीक्षा यूपीएससीची असेल तर हवं ते केडर मिळणे न मिळणे
– सगळं मुलाखत कशी जाते, यावर अवलंबून आहे. म्हणून मुलाखतीची ही २५-३५ मिनिटं आयुष्याची
दिशा ठरवतील इतकी महत्त्वाची आहेत.
आयुष्याच्या या सर्वात महत्त्वाच्या वळणावर अचूक मार्गदर्शन मिळावं, म्हणून हे पुस्तक आपण
प्रकाशित करतोय.
मुलाखत देत असताना विचारात घ्यायचे अनेक बारकावे या पुस्तकात दिले आहेत.
आपण जसं आहोत तसं असणं – Being one’s own self.
जसं आहोत तसं मुलाखतीच्या पॅनेलला सामोरं जाणं, जसं आहोत तसं स्वत:ला सादर करणं, जसं
नाहीत तसं असायचा प्रयत्न न करणं, म्हणजेच खोटेपणानं, कृत्रिमपणानं मुलाखतीला सामोरं न जाता,
खरेपणानं, सहजपणानं, आपल्या उत्स्फूतृ व्यक्तिमत्त्वानं मुलाखत देणं
हा मुलाखत देण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.
जीवनातल्या याशाचाही हाच सर्वोत्तम मार्ग आहे.
Reviews
There are no reviews yet.