₹550.00 ₹440.00
नवा विजयपथ
सध्याच्या काळात स्पर्धापरीक्षा सतत बदलत जात असतात. सगळे जगच सतत बदलत असल्यामुळे हे अगदी
स्वाभाविक आहे. ‘नवा विजयपथ’ हे पुस्तक UPSC आणि MPSC नागरी सेवा परीक्षांबरोबरच भारतातील अन्य
महत्त्वाच्या स्पर्धापरीक्षांविषयीची अद्ययावत माहिती देते. UPSC आणि MPSC नागरी सेवा परीक्षांमधील प्रत्येक
टप्प्याच्या तयारीविषयी सखोल माहिती या पुस्तकात दिलेली आहे.
परीक्षांच्या माहितीबरोबरच नागरी सेवा या लोकसेवेसाठी आणि देशसेवेसाठी आहेत हा संस्कारही हे पुस्तक करते.
संपूर्ण माहिती आणि मार्गदर्शन घेऊन स्पर्धापरीक्षा अंगावर घेण्यासाठी हे पुस्तक वाचकाला तयार करते.
स्पर्धापरीक्षांच्या तयारीतील मूलभूत मुद्द्यांचे मार्गदर्शन या पुस्तकात आहे. उदाहरणार्थ –
* करियर कसे निवडावे
* पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि निबंध यासाठी वाचन आणि लेखन कसे करावे
* मुलाखत कशी द्यावी याबाबत सर्वंकष उहापोह
* प्रचलित घडामोडींचा अभ्यास कसा करावा
* स्वाध्याय कसा करावा
* बहुपर्यायी प्रकारचे प्रश्न कसे सोडवावेत
* अभ्यास कौशल्ये
* विशेषत: मुख्य परीक्षेला आवश्यक असे लेखन कौशल्य
* वैकल्पिक विषय कसा निवडावा
* निबंधलेखन
* अभ्यासाचे नियोजन आणि वेळेचे व्यवस्थापन
…आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे प्रशासकीय सेवांमधील अडथळे आणि त्यासाठी आवश्यक अशी मूल्यव्यवस्था
जोपासण्याबाबत.
स्पर्धापरीक्षांना नुकतीच सुरुवात करू इच्छिणाऱ्यांना मूलभूत माहिती देण्याचे काम करतानाच श्री. अविनाश
धर्माधिकारींच्या खुसखुशीत लेखन शैलीमुळे आणि त्यांच्या स्वत:च्या मुलाखतीपासून ते प्रशासन काळातील त्यांच्या
अनुभवांमुळे हे पुस्तक वाचकाला अधिकच खिळवून ठेवते. त्यांच्या प्रशासनातील अनुभवामुळे आणि स्पर्धापरीक्षांना
मार्गदर्शन करण्याच्या ३० पेक्षा अधिक वर्षांच्या अनुभवामुळे हे पुस्तक ‘वाचलेच पाहिजे’ या प्रकारात गेलेले आहे.
Sangram solanke –
Best book for mpsc and upsc